गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक जनसहयोगाची गरज

0
33

# ग्राम तिगाव येथे थिमेटिक प्रशिक्षण संपन्न
आमगाव :- तालुक्यातील ग्राम पंचायत तिगाव येथे राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष पुणे व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वराज्य अभियान शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण थिमटिक प्रशिक्षण आयोजित १५ व १६ मार्च रोजी करण्यात आले होते. या प्रशिक्षणात परिसरातील तेरा ग्राम पंचायती मधील सरपंच,उपसरपंच, मुख्याध्यापक, बचत गटाचे सीआरपी, ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,जलसुरक्षक, रोजगार सेवक इत्यादी सहभागी झाले होते. सदर प्रशिक्षणाला प्रशिक्षण समन्वयक विनायक पाखमोडे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या ६० टक्के बंधीत निधीतून घ्यावयाच्या जलसमॄद्ध गाव, स्वच्छ व हरीत गाव संकल्पनेवर विस्तॄत माहिती दिली.गावातील सर्व जनतेला सर्वांसाठी पुरेसे स्वच्छ पाणी आणि पिण्यायोग्य पाणी सुविधांची उपलब्धता करून देणे, गावातील जनतेने घरगुती शौचालयांचा १००% वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जाणीव जागृती करणे तसेच सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरणावर यंत्रणा विकसित कशी करता येईल यावर विस्तृत माहिती प्रशिक्षण समन्वयक विनायक पाखमोडे यांनी दिली. प्रशिक्षक वर्षा जनबंधु जनबंधु यांनी शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण, सतरा ध्येय व नऊ संकल्पना यावर विस्तृत माहिती देतांना म्हटलें कि भारताची राष्ट्रीय विकास ध्येये व “सर्वांची योजना सर्वांचा विकास” ही धोरणे शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्यासाठी गावातील विविध समित्या- संस्था, ग्राम पंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शिक्षण समिती, आरोग्य व पोषण आहार, स्वच्छता समिती, मुख्याध्यापक, समुदाय आणि घटकांशी समन्वयातून ही शाश्वत विकासाची ध्येय साध्य करणे निश्चितच शक्य होणार आहे.भारत सरकारच्या पंचायती राज विभागाने तयार केलेल्या तज्ञ गटाने पंचायत राज संस्थांमध्ये ही ध्येय साध्य करण्यासाठी संकल्पनात्मक दृष्टीकोणाचा अंगीकार करणेबाबत सूचीत केले असून यासाठीच गरीबी मुक्त आणि रोजगार वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव , बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव , पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षीत गाव,सुशासनयुक्त गाव तसेच लिंग समभाव पोषक गाव या नऊ संकल्पना/विषय निश्चित करून ग्राम विकास साध्य करायचा आहे असे सांगितले तसेच ई-ग्राम स्वराज पोर्टल व ग्राम पंचायत विकास आराखडा अपलोड करण्याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षक राखी ठाकरे यांनी ग्राम सभेने निवडलेल्या १ ते ३ संकल्पना विशद करून सांगितले की स्वच्छ व हरीत गाव आणि जलसमृद्ध गाव यावर सविस्तर मार्गदर्शन करतांनी म्हटले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी सूचना देऊन,सर्व बाबींचा समावेश करून ग्राम विकास आराखडा तयार करावा.सदर दोन दिवसीय प्रशिक्षणात ग्राम पंचायत तिगाव,अंजोरा, बघेडा, वळद,कवडी,रामाटोला, पानगाव, सुरकूडा, आसोली, फुक्कीमेटा,जांभुरटोला,सोनेखारी,येरमडा, मधील सर्व सरपंच, उपसरपंच, आशा वर्कर्स, जलसुरक्षक, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, सीआरपी,बचत गटाचे अध्यक्ष इत्यादिचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता.