सफाई कामगारांना कामावरून कमी केल्यास तीव्र आंदोलन; चिपळूणकर यांचा इशारा

0
9


चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत नालेसफाई चे कंत्राट मिळालेल्या कंत्राटादारामार्फत 50 टक्के कामगारांची कपात केली जाणार आहे. त्यामुळे जवळपास १०६ अस्थाई कामगारांवर बेरोजगारी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यासाठी मोठी जबाबदारी असल्याने या कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेत्या अड. हर्षल चिपळूणकर यांनी दिला.

https://www.khabarbat.in/2023/03/worker-leader-advocate-harshal.html
महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विभागाच्या महाकाली झोनअंतर्गत कामगारांची बैठक विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून आज घेण्यात आली. यावेळी ऍड.  हर्षल चिपळूणकर यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाई करण्यासाठी 206 अस्थायी कामगार आहेत. मात्र नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या संकेत 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 106 कामगारांवर बेरोजगारी येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या कामगारांवर आहे. असे असतानाही अचानक केवळ स्वतःच्या लाभापोटी 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगार विरोधी कोणताही निर्णय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा एड.  चिपळूणकर यांनी दिला आहे.