लोहार समाजातील समस्या अधिवेशनात मांडणार

0
19
  • ■ आमदार कोरोटे यांच्याकडून ग्वाही.
  • ■ ठाणा(आमगाव) येथे लोहार समाज मेळावा
  • आमगावं/ देवरी,दि.२७: आपल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोहार समाजातील लोक राहतात. लोहार समाजातील लोक हे लाकडी फर्निचर, वेल्डिंग अशा अनेक प्रकारचे लोहार काम करून आपले उदरनिर्वाह करतात. परंतु, लोहार समाजावर शासन व प्रशासनातील अधिकारी उदासीन असून यांच्यावरील समस्येचे निराकरण न करता यांच्यावर अन्याय करतात. तरी तुमच्यावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध येत्या पावसाळी अधिवेशनात आपल्या लोहार समाजातील प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी दिली.
  • आमदार कोरोटे हे आमगावं तालुक्यातील ठाणा येथे लोहार समाज संघटन च्या वतीने रविवारी(दि. २६) रोजी आयोजित तालुकास्तरीय लोहार समाज मेळाव्यात उदघाटक म्हणुन बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वैदर्भीय गाडी लोहार महासंघाचे अध्यक्ष चरणदास बावणे हे होते.
  • या प्रसंगी वैदर्भीय गाडी लोहार महासंघ नागपूरचे सचिव एस.ए. मांडवगडे, ठाणाचे पोलीस पाटील प्रदीप बावनथडे, ठाणाचे उपसरपंच विजय बनकर, मुख्यध्यापक टी.एस.अवचटे, पोरस शेंडे, राजपाल बावनकर, पुष्पाताई कुंभरे, ग्रा.प.सदस्य सुरेशाम कटरे, बाबूलाल कोरे, प्रमोद वंजारी, देवीलाल केवट यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
  • यावेळी समाजाच्या वतीने आपल्या विविध समस्ये विषयीचे निवेदन आमदार कोरोटे यांना सादर करण्यात आले.या मेळाव्याचे प्रास्ताविक व संचालन राजेश सोनवाने यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.या मेळाव्याच्या आयोजना करिता खेमराज बागडे, प्रल्हाद पंधराम, दुर्गाप्रसाद शेंडे, चितेश बावणे, राजेश सोनवाने, वंदना कोसरे, रिनाताई सोनवाने, रायाबाई सोनवाने, छायाबाई सोनवाने यांच्या सह समाज संघटनेतील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.