शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिशन थायरॉईड मोहिम

0
14

गोंदिया,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे मिशन थायरॉईड अभियान राबविण्यात आले. मिशन थायरॉईड या मोहिमेचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदियाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

        या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अपूर्व पावडे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान नाक व घसाशास्त्र विभाग, डॉ. नंदकिशोर जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी, डॉ. व्ही.पी. रुखमोडे, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरिररचनाशास्त्र विभाग, डॉ. संजय राऊत, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. गिरीष अंबादे, सहयोगी प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोग विभाग, श्रीमती मालती डोंगरे, अधिसेविका, संजय भोंडे, प्रशासकीय अधिकारी, हे उपस्थित होते.

         मिशन थायरॉईड अभियानाच्या अनुषंगाने केटिएस सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील बाहरुग्ण विभागामध्ये दर गुरुवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत थॉयराईड संबधित रुग्णांची तपासणी करण्याकरीता विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व नागरीकांना या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. कुसूमाकर घोरपडे यांनी केले आहे.

 थॉयराईडचे लक्षणे :- अचानक वजन वाढणे अथवा कमी होणे, आवाज घोगरा होणे, अत्याधिक थकवा जाणवणे, केस झडणे, प्रमाणाबाहेर थंडी वाजणे, लहान मुलांमध्ये शारिरीक वाढ कमी होणे, बद्धकोष्ठता व चेह-यावर सुज येणे व लहान मुलांमध्ये शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होणे अशी लक्षणे आहेत.

थॉयराईड आजारामुळे होणारे दुष्परीणाम :- डोळयाशी संबधित आजार, हाडे ठिसूळ होणे वंध्यत्व व गर्भपात हे थायरॉईडचे दुष्परिणाम आहेत. थॉयराईड आजाराचे दुष्परीणाम टाळण्यासाठी नागरीकांनी वेळीच उपचार करणे आवश्यक असल्याचे कान नाक व घसाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अपुर्व पावडे यांनी सांगितले. सदर अभियान यशस्वीपणे पार पाडण्याकरीता डॉ. गौरव अग्रवाल, सहायक प्राध्यापक, कान नाक व घसाशास्त्र विभाग, डॉ. कृपाल पारधी, डॉ. ममता रंगारी, डॉ. शिल्पा पटेरीया, डॉ. सुरभी लुटे व श्रीमती मिनाश्री बिसेन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.