24.9 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ शेतात फवारणीसाठी गेले अन् मधमाशांनी केला भीषण हल्ला, शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

शेतात फवारणीसाठी गेले अन् मधमाशांनी केला भीषण हल्ला, शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

0
7
गोंदिया : गोंदियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतामध्ये फवारणीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या ४८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील झालिया येथील परिसरात ही घटना घडली. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात रवींद्र पटले (वय ४८ वर्षीय) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या  घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतक रवींद्र पटले हे झालिया येथील आपल्या शेत शिवारात पिकांवर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणी सुरू असताना अचानक परिसरात असलेल्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या संख्येनं मधमाशांनी दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती शेतकरी आणि मजुरांनी पटले यांच्या कुटुंबीयांनी दिली.