ईटखेड्यात पुन्हा दे धक्का विकास संस्थेत शेतकरी मंचचे सर्व १३ उमेदवार विजयी

0
18

अर्जुनी मोरगाव,दि.01ः– विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित इटखेडा इसापूर येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित शेतकरी विकास मंचचे सर्व तेरा उमेदवारांनी भाजपा प्रणित किसान विकास परीवर्तन पॅनलच्या
सर्व उमेदवारांना पराभूत करु मोठया फरकानी विजयी मिळविला.
ईटखेडा ईसापुर या दोन गावांमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा नुकताच निकाल लागला .त्यात ईतर मागासवर्गातून छबील बुराडे, विशेष मागासप्रवर्गातून भास्कर मेश्राम, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून देविदास गोंडाने, महिला प्रवर्गातून प्रमिला दुधराम जिरित्कार , पुष्पाबाई केशव लांजेवार तसेच सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष देशमुख ,वासुदेव गोठे, पुंडलिक चांदेवार ,यादवराव भावे तुकाराम मडावी, मोरेश्वर मिसार, उद्धव मेहंदळे ,मनोहर लांजेवार या सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजयी झाले.
राष्ट्रवादी व काँग्रेस विरोधात भाजपा असा ग्रामपंचायती रंगलेला सामना पुन्हा दोन्ही गावात सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत रंगला होता. मतदारांनी पुन्हा तीच पुनरावृत्ती केली व पुन्हा भाजपाचा सफाया केला. भविष्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस ही युती अशीच राहिली तर भाजपंना नक्की धूळ माती खावे लागेल अशा चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीकडे तालुकावासियाचे लक्ष होते. पक्षभेद विसरून विजयी अनेकांनी उमेदवाराचे अभिनंदन केले.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन व मतदारांचे आभार सरपंच आशाबाई इंद्रदास झिलपे, लोचन चांदेवार, विलास भावे, वासुदेव गिरीपुंजे , माधव शेंडे, केवलराम शेंडे, इंद्रदास झिलपे ,अर्जुन कोरचे, येणूबाई कांबळे ,चंद्रकलाबाई शेंडे ,गोपीचंद कावळे ,सर्वेश धांडे ,उपसरपंच आशीर्वाद लांडगे, ग्रा. प. सदस्य सचिन लांजेवार , संजय कांबली,रमेश कुंभरे, हरिदास प्रधान, तेजराम लांजेवार,सदाशिव लांडगे, नितीन कावळे ,संजय मैंद, दीपक दुपारे, वासुदेव गिरेपुंजे, जनार्दन लांजेवार, गोविंदा सोंदरकर ,श्रावण सोंदरकर, लुमाजी जिरितकार, ंदेवराम लांजेवार व इतरांनी केले आहे.