गोंदिया पोलिस दलाच्या वतीने दादारोला खिडकी योजनेंतर्गत मेळावा उत्साहात

0
19

गोंदिया -पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने पोलिस दादारोला खिडकी योजनेंतर्गत, गोंदिया जिल्हा पोलिस दल व एसआयएस (इंडिया) लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, नक्षलग्रस्त भागातील तरुणांना रोजगार मिळावा. याकरिता २३ मार्च रोजी गुरुवारला पोलिस ठाणे नवेगावबांध येथे कामांडेट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जशपुर यांच्या वतीने सुरक्षा रक्षक, सुरक्षा सुपरवायझर या पदासाठी दहावी व बारावी पास युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. १५0 युवकांनी सहभाग घेऊन ३0 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर, पोलिस हवालदार मारवाडे, पोपो गंडा सेलचे हवालदार मार्टिन यांनी यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. सदर भरती प्रक्रियेत १५0 युवकांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३0 युवकांना शारीरिक मोजमाप व इतर परीक्षेत उत्तीर्ण झाले, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या युवकांना पुढील प्रशिक्षणाकरिता कमांडेड कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जशपूर येथे प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळावा याकरिता ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर,पोलीस उपनिरीक्षक नागरे, सी६0 पथकाचे पोलीस हवालदार मारवाडे, पोलिस शिपाई विलास वाघाये व सैनिक तसेच पोलिस हवालदार मार्टिन, पोलिस नायक हरिणखेडे यांनी सहकार्य केले. पोलिस दल गोंदियाच्या वतीने वेळोवेळी आयोजित करण्यात येणार्‍या, रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून, युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंदिया पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह* चे PSI आबा कटपाळे, PSI विजय कुमार पुंडे, PSI माणिक गुट्टे व पोलीस अंमलदार यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दल व तहसिल कार्यालय देवरी, आधार सर्विस सेंटर देवरी, प्रधानमंत्री आरोग्य विभाग, गोंदीया, सेतु कार्यालय पालांदुर यांचे सह आज दिनांक – 27/03/2023 रोजी *सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह येथे जात प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, आभा कार्ड, आयृष्यमान भारत कार्ड व आधारकार्ड, पॅनकार्ड बनवणे, अपडेट योजना असे भव्य शिबीर येथे आयोजीत करण्यात आले होते.सदर शिबिरास मगर डोह, पालांदुर (जमीदारी) अश्या अतिदुर्गम नक्षलग्र स्त भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात 350 ते 375 स्थानिक नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. आयोजित शिबिरात नागरी कांचे 39 जात प्रमाणपत्र ,26 डोमेसाईल, 82 आयुष्यमान कार्ड, 10 आधार कार्ड, 07 पॅन कार्ड काढण्यात आले.