आमचा पायाभूत सुविधा उभाण्यात भर : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
13

गोरेगाव : ग्रामपंचायत पिंडकेपार  येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाला. दरम्यान आमचा पायाभूत सुविधा उभारण्यावर भर आहे असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गावात आणखी काही कार्य करावयाचे असल्यास माझ्यासाठी संपर्क करावा असे आवाहन सुद्धा केले. भूमिपूजन केलेल्या कामात सोलर पंप यूनीट बसविणे १८ लक्ष रुपये, सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम १२ लक्ष रुपये, रस्ता खडीकरण २०  लक्ष रुपये, कन्हारटोला येथे शाळा इमारत वर्गखोली बांधकाम १२ लक्ष रुपये कामांसाठी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजन करून कामांची सुरुवात करण्यात आली.

यावेळी गोरेगाव पंचायत समितीचे सभापती इंजि. मनोज बोपचे, जि. प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समिती सदस्य शितलताई बिसेन, पंचायत समिती सदस्य रामेश्वरजी महारवाडे, माजी उपसभापती सुमेंद्रजी बिसेन, धनलाल बिसेन, श्रीरामजी भैराम, राजेन्द्र मेश्राम, लोकचंद बघेले, तेजेंद्र हरिणखेडे, मेशजी बिसेन, एच.आर. पटले, खुमेंद्र बिसेन, तेजराम बघेले तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.