गहाळ झालेल्या 51 मोबाईलचा पोलिसांनी शोध लावून तक्रारदारांच्या स्वाधीन केले

0
12

गोंदिया,दि.22ः- अक्षय तृतीया व रमजान ईदच्या मुहूर्तावर गहाळ झालेले 51 मोबाईल पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांचे हस्ते सामान्य नागरीकांना परत करण्यात आले.विशेष मोहीमेतर्गत गोंदिया शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करीत चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईलचा शोध लावून आरोपींना जेरबंद करुन त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल न्यायालयाच्या परवानगीने वितरीत करण्यात आले.

मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारदार प्रिती राहूल वालदे रा. श्रीनगर, गोदिया हिने तिचा व्हिवो कंपनीचा वाय 15 मोबाईल मार्च 2021 मध्ये गहाळ झाल्याबाबत गोदिया शहर पोलीस ठाणेला तक्रार दिली होती. या प्रमाणेच इतर नागरीकांनी सुध्दा सन 2021, 2022, सन – 2023 मध्ये मोबाईल गहाळ झाल्याबाबत पोलिसाकंडे तक्रारी दिलेल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे पो.ठाण्यास प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गोदिया शहर पोलीसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रीक मदतीने शोध घेवून गहाळ मोबाईलचा सातत्याने पाठपुरावा करून व परीश्रम घेवून विविध कंपनीचे महागडे एकूण 51 मोबाईलचा शोध घेत ते मोबाईल परत मिळविले.ते मोबाईल आज 22 एप्रिल रोजी तक्रारदार मुळ मालक असलेल्या नागरिकांना वितरीत करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस स्टेशन गोंदिया शहर पो.नि.चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. सागर पाटील, पोहवा. कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, म.पो.हवा. रिना चव्हाण, पोशि. पुरूषोत्तम देशमुख, सुभाष सोनावने, कुनाल बारेवार, मुकेश रावते, दिनेश बिसेन यांनी केली.सोबतच गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर सेल, गोदिया येथील स.पो.नि. शिंदे, पो. हवा दिक्षीत दमाहे, पो. हवा. प्रभाकर पालांदूरकर, पो. हवा. मोहन शेंडे, पो. हवा. संजय मारवाडे, पोशि बरैया यांची तांत्रिक मदत तपासात घेत शोध घेतला. नमुद गहाळ मोबाईल शोधे घेणे बाबत पोशि. पुरूषोत्तम देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. वरिष्ठांनी अथक परिश्रम घेवून गहाळ मोबाइलचा शोध करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.