ग्रामपंचायत गंगाझरी ने केला नियमित कर्ज भरणा करणाऱ्या नागरिकांचा सत्कार

0
7

गंगाझरी येथे महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

पारिवारिक संकटकाळी महिलाच धावून येतात : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले

गोंदिया : ग्रामपंचायत गंगाझरी येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियमित कर भरणा करणाऱ्या नागरिकांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम देखील उपस्थित होत्या. ग्रामपंचायत स्वायत्त संस्था असून ग्रामपंचायत मार्फत साफसफाई तसेच इतर मुलभूत सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात. मात्र कर भरणा वेळेवर होत नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासात अडथळा निर्माण होतो. नियमित कर भरणा करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करून ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या अभिनव उपक्रमामुळे कर गोळा अधिक जलद गतीने होईल. असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला.

दरम्यान महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून बचत गटाला नवी भरारी मिळेल तसेच काही मदत लागल्यास जिल्हा परिषद सदैव आपल्या पाठीशी आहे असा विश्वास उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांना दिला.

यावेळी जि.प. सदस्य अश्विनीताई पटले, पं.स. सदस्य वंदनाताई पटले, पं.स. सदस्य अजाबराव रिनायत, तिजेशजी गौतम, संजूभाऊ पटले प्रथम नागरिक, उपसरपंच सेविकाताई आगासे, माजी पं.स. सदस्य प्रकाशजी पटले, ग्रा.प. सदस्य राजेशजी कटरे, महेंद्र धुर्वे, रामसिंग पंधरे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.