मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे: पो.नि.लांबेवार

0
14

जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा धोका
जिल्हा शोध बचाव दलातील सदस्यांना SDRF नागपूरतर्फे आपत्ती व्यवस्थापनाची तालिम

गोंदिया-: मान्सून कालावधीत जिल्हयातील 96 पुरप्रवण गावांना पुराचा धोका आहे. जिल्हयातील नद्या, धरण, जलाशय इत्यादी ठिकाणी या वर्षी पाणीचा साठा जास्त असल्यामुळे सर्व संबंधित विभाग यांनी मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक मारोती लांबेवार, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांनी कटंगी जलाशय गोरेगाव येथे आयोजित एक दिवसीय मान्सून-2023 पुर्व तयारी रंगीत तालिम कार्यक्रमात केले.
या वेळेस एस.एस. कांबळे तहसलिदार गोरेगांव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख नरेश ऊके व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.मनिष धकाते, डॉ. स्निग्ता ठाकुर, डॉ. श्रृती बिसेन, डॉ. पारिश कामडी, व अजय डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रात्यक्षिक कार्यक्रमात लांबेवार म्हणाले की, जलसंपदा व महसुल खात्यातील अधिकारी कर्मचारी यांनी समन्वय ठेऊन कार्य करणे गरजेचे आहे. तसेच धरणाचे पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील नागरीकांना पूर्व सूचना देऊन नदीची पातळी किती आहे, याबाबत सर्व संबंधित विभाग यांना माहिती देणे आवश्यक आहे. या दरम्यान अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थीतीला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
जिल्हयात सरासरी 1220.49 मि.मी पाऊस पडतो तसेच गोंदिया जिल्हयाच्या बाजूला मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमा लागून आहे. बालाघाट आणि राजनांदगाव जिल्हयात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्हयात प्रवेश करतो. तसेच संजय सरोवर (मध्यप्रदेश) येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 25 तासात वैनगांगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचतो. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 27 तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगांव घाट पर्यंत पोहोचतो. या दरम्यान धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना या वेळेस त्यांनी दिली .
सदर कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी जिल्हा शोध व बचाव दलातील सदस्यांना प्रात्यक्षिकाचे लाभ घेवून पुर परिस्थतीवर मात करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभाग प्रमुखांनी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावे. तसेच वाट्सअप ग्रुप तयार करुन पूरपरिस्थतीच्या सूचना नागरीकांना द्यावी. पूर परिस्थीतीच्या वेळेस टाकाऊ वस्तुंचा प्रयोग करुन आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करावी, असे ते म्हणाले. आपत्तीचे पूर्व नियोजन महत्वाचे असून जिल्हयातील 96 गावांमध्ये पूर परिस्थतीचे संभाव्य धोके आहेत. मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाय योजना करणे संबंधी शोध बचाव दल सज्ज असून 24 तास कार्यरत आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकाची माहिती देऊन घरघुती टाकऊ वस्तुपासून तयार करण्यात आलेल्या साहित्यांपासून फ्लोटींग डिवाईस तयार करुन पाण्यात त्यांचे प्रयोग दाखविले. रंगीत तालिमेकरिता गोरेगाव तालुक्यातील कटंगी जलाशय येथे एम.बी.बी.एसच्या विद्यार्थी व उपस्थित तलाठी, मंडळ अधिकारी व गावकरी या सर्व प्रशिक्षणार्ऱ्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पाण्यात बोट व इंजिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यतिचेशोध कार्य, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग इत्यादीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रयोग करुन दाखविण्यात आले.
सदर कार्यक्रमात इंद्रकुमार बिसेन, चिंतामन गिऱ्हेपुंजे, जितेन्द्र गौर, नरेश उके, जसवंत राहांगडाले, रवि भांडारकर, संदिप कराळे, दिनू दिप, राजकुमार खोटेले, मडळ अधिकारी बी.डी. भेंडारकर, बी.एन वरखडे, तलाठी ए.के. बघेले, कु.एच.एम. बोरकर, एम.आर. पांडे, के.के. बिसेन, एन.आर.चौधरी, एन.आर. शंभरकर, तुलशी टेंभरे सरपंच कटंगी, श्रीमती ललीता चौरागडे तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पी.एस. अहिरे, पी.एस. कावडकर, पी.बी. त्रिकाळ, एस.एस. लांजेवार, आर.एम. पाटील व IRB बटालियन व अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, गावकरी तथा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील एम. बी. बी. एस. चे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.