धापेवाडा-गोंदिया मार्ग ठरला अपघात प्रवण

0
25

तिरोडा- तिरोडा व गोंदिया या दोन तालुक्याला जोडणार्‍या प्रमुख मार्गापैकी तिरोडा-धापेवाडा हा एक मार्ग आहे. मात्र, हा राज्य मार्ग गेल्या १५ वर्षांपासून विभाग आणि जनप्रतिनिधींच्या उदासीन कारभारामुळे दुरावस्थेत आला आहे. या मार्गावरील खड्डे उघडपणे अपघाताला आमंत्रण देत आहेत. एकंदरीत दुरावस्थेत आलेला धापेवाडा-गोंदिया मार्ग हा अपघाताचा प्रवण मार्ग ठरला आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत आहेत. असे असले तरी संबंधित विभाग मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहे का? असा सवाल संतप्त नागरिकांडून उपस्थित केला जात आहे. या मार्गाची डागडुजी करण्यात आली नाही तर परिसरातील संतप्त नागरिक आंदोलनाचा पवित्र्यात दिसून येत आहेत.
गोंदिया व तिरोडा हे दोन्ही तालुक्यांची सीमा एकमेकाला लागून आहे. या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख मार्गापैकी तिरोडा-धापेवाडा-गोंदिया हा एक मार्ग आहे. या मार्गावर परसवाडा, गोंडमोहाडी, महालगाव, मुदार्डा, नवेगाव, रतनारा या प्रमुख गावांसह अनेक गाव व वाडे जुडलेली आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. ऐवढेच नव्हेतर हा मार्ग रेती तस्करांसाठीही प्रमुख मार्ग ठरला आहे. या मार्गावर रात्र-दिवस रेती व गौणखनिज करणारे जड वाहने धावत असतात. तर दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थी या मार्गानेच ये-जा करावी लागते. मात्र हा मार्ग गेल्या १५ ते २0 वषार्पासून दुरावस्थेत आला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क दुर्लक्ष केले आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डय़ातून मार्ग शोधणे कठीण जात आहे. परिणामी हा मार्ग अपघाताला उपडपणे आमंत्रण देत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावर मोठय़ा अपघाताची प्रतीक्षा करीत आहे की काय? असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे जनप्रतिनिधी देखील या गंभीर समस्येला घेवून उदासीन असल्याचे बोलले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.