34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आ.रहागंडालेच्या हस्ते आयसीयु कक्षाचे उदघाटन

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आ.रहागंडालेच्या हस्ते आयसीयु कक्षाचे उदघाटन

0
20

blank

तिरोडा- आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त येथील चलतीबेन उपजिल्हा रुग्णालयात अदानी फाऊंडेशनच्या सीएसआर योजनेतून  आमदार विजय रहागंडाले यांच्या प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या आयसीयू कक्षाचे उदघाटन आमदार विजय रहागंडाले याच्या हस्ते करण्यात आले.गेल्यावर्षी सोनोग्राफी सेंटरच उघडण्यात आले होते.यावेळी माजी आमदार भजनदास वैद्य,हरिष मोरे,बाजार समितीचे मुख्य प्रशासक डाॅ.चिंतामण रहांगडाले,वसंतकुमार भगत,संजय बैस,सुबोधसिंग,उमाकांत हारोडे,भाऊराव कठाणे,तेजराम चव्हाण,सुनिल येरपुडे,अनुप बोपचे,पिटु रहागंडाले, व डाॅ.हिम्मत मेश्राम उपस्थित होते.

blank