शहीद जवान नागोसेला मानवंदना

0
14

अहेरी- तालुक्याच्या रेपनपल्ली पोलीस ठाण्याअंतर्गत छल्लेवाडा गावात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस हवालदार नानाजी बारकुजी 9e113f49-bf83-4717-bdca-7c99ffc47777 यांना गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर गुरूवारी मानवंदना देण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) शिवाजी बोडखे, विशेष पोलीस महानिरीक्षक (सीआरपीएफ) राजकुमार, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, १९२ तुकडीचे समादेशक मनोजकुमार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस उपअधीक्षक सुनील बाबर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आदी उपस्थित होते. यावेळी शहीद पोलीस जवानाच्या पत्नी व तीन मुली यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सात्वन करून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासन आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, असे सांगितले. शहीद जवान नागोसे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार भाऊ, दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.