मका खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

0
32

गोंदिया दि.11 :- शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2022-23 मधील मका खरेदीकरीता दिनांक 4 ते 20 मे या कालावधीत NEML पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. त्यानुसार दि तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. अर्जुनी/मोरगाव, दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या. अर्जुनी/मोरगाव (नवेगावबांध), विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. अर्जुनी/मोरगाव, कृषक शेतकरी उ.सा.सा.पु. व खि. व संस्था मर्या. भिवखिडकी, देवरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. देवरी (पांढरी) या सबएजंट संस्थांकडे नोंदणी करावी.

         तरी सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांनी वरील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर जाऊन स्वत:चे चालु हंगामाचे सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करुन दिनांक 20 मे 2023 पर्यंत मका खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी. तसेच शेतकरी महा नोंदणी ॲपद्वारे सुध्दा स्वत: ऑनलाईन नोंदणी करु शकतात. शासनाच्या मका खरेदी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.एस.इंगळे यांनी केले आहे.