पिसाळलेल्या श्वानांचा पाच जणांना चावा

0
9

तुमसर -शहरातील विनोबा भावे बायपास मार्गावरील बारसमोर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून करून ५ जणांना जखमी केले. यामध्ये ३ महिला, एक तरुण आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींवर  तुमसर येथील सुभाषचंद्र बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले.पंकज शेंडे हे मॉर्निग वॉकला निघाले असता कुत्र्याने हल्ला करून यांच्या डोळ्यांजवळ चावा घेतल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर एक महिला घरासमोर रांगोळी काढत असताना कुत्र्याने चावा घेतला. सदर पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात सध्या मोकाट श्वानांची संख्या चांगलीच वाढली आहे. या श्वानांकडून अनेकवेळा पहाटेच्यावेळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.