माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत 33 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

0
25

तिरोडा,दि.24ः येथील पंचायत समिती सभागृहात माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे 33 मुदत ठेव प्रमाणपत्र लाभार्थ्यांना जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभपाती कुन्ताताई पटले होत्या.प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे उपसभापती हुपराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्या एड. माधुरीताई रहांगडाले,तूमेश्वरीताई बघेले,जिल्हा परिषद सदस्य किरणभाऊ पारधी,चतुर्भुज बिसेन,पवन पटले,पंचायत समिती सदस्या ज्योतीताई सरनागत,वनिता भांडारकर,सुनंदा पटले,प्रमिला भलाई,दिपाली टेंभेकर,कविता सोनवाणे,पंचायत समिती सदस्य डॉ.चेतलाल भगत,विजय बिन्जाडे,गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, संरक्षण अधिकारी श्यामकुवर,बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कनकलता काळे, श्रीमती पुष्पा भांडारकर, श्रीमती वंदना दाते, श्रीमती शकुंतला दानवे, श्रीमती दिपाली नवथडे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा कावडे, श्रीमती रीना भास्कर, श्रीमती पुनम रहांगडाले, श्रीमती ललिता पटले यांनी अथक परिश्रम घेतले.