कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

0
16

कुरखेडा,दि.28- कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच ग्रेस ऑथों केअर मल्टी स्पेशीअॅलीटी हॉस्पीटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र कार्यालय, कुरखेडा येथे निःशुल्क आरोग्य तपासणी ऑर्थोपेडीक तपासणी शिबीराचे आयोजन आज 28 मे रोजी करण्यात आले होते. सदरील शिबीर डॉ. किशोर मानकर (भा.व.से.), वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली वनवृत्त गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन तसेच धर्मवीर सालविठ्ठल (भा.व.से.), यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनोज चव्हाण (म.व.से.), उपविभागीय वनअधिकारी कुरखेडा,बालाजी डिगोळे वनपरिक्षेत्र अधिकारी पुराडा / कुरखेडा,संजय मेहेर वनपरिक्षेत्र अधिकारी, देलनवाडी,लक्ष्मीकांत ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, बेडगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदरील शिबीरामध्ये डॉ. निनाद गोडघाटे, MS (ORTHO) Mch (UK) Trauma and joint Replacement Surgeon तसेच, डॉ. नेहा गोडघाटे, MS (ORTHO) Mch (UK) DNB Arthroscopy Surgeon यांच्याव्दारे रुग्णांची निःशुल्क वैद्यकिय तपासणी करुन निःशुल्क औषधोपचार केले. सदरील शिबीराच्या यशस्वीतेसाठी एम. एम. सालोरकर क्षेत्र सहाय्यक, कुरखेडा,एम. एल. किनेकर क्षेत्र सहाय्यक, गोठणगांव, एच. जी.. एकुण 171 झोडगे क्षेत्र सहाय्यक, गेवर्धा, एस. एल. शेंडे क्षेत्र सहाय्यक, पलसगड,एन. एच. नाकाडे बिटरक्षक, कुरखेडा, श्री. आर. बी. पाटील बिटरक्षक, वडेगांव,एस. एस. रामटेके बिटरक्षक, आंधळी,व्ही. बी. पावडे बिटरक्षक, गुरनोली, कु. यु. पी. मोहुर्ले वनरक्षक, कु. जी. बी. आरेवार वनरक्षक एस. व्ही. पिल्लारे वनरक्षक, व्ही. एन. हातमोड़े वनरक्षक,पी. के. शेख वनरक्षक, कु. एम. एम. कळमकर वनरक्षक, कु. एस. एम. दुर्गे वनरक्षक, आर. वाय. नारनवरे वनरक्षक तसेच, पुराडा, बेडगांव, मालेवाडा, देलवाडी, वडसा, आरमोरी, पोर्ला वनक्षेत्रातील सर्व वनअधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.