निंबा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव,दि.08-तालुक्यातील ग्रामपंचायत निंबां येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य सशेंद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.हर घर जल, घर घर नळ भारत सरकारची योजना असून 2019 ते 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरेशा पाणी उपलब्ध होईल या उद्देशाने सुरू केली असल्याची माहिती सरपंच वर्षा विजय पटले यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले.सदर योजनेमुळे पिपरटोला, हलबिटोला, व निंबा या तिन गावांना या योजनेचा पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेचे किंमत एक कोटी 67 लाख रुपये एवढी आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे, ,उपसरपंच पि.आर कटरे, ग्रामपंचायत सदस्य मालताताई भगत ,पुष्पाताई भेंडारकर ,पुष्पाताई पटले ,संगीताताई कुंजाम ,नंदलाल उईके, महेश भगत,बुधराम बिजेवार, मदन कोटांगले, डॉ.गणराज कुमडे ,ताराचंद बोपचे, खिदाराम बीसेन, देवकरन कटरे ,विजय पटले , दवणलाल रहागडाले गीताबाई रहागडाले, चंद्रकलाबाई चौहान व गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्क्रमा सूत्रसंचालन विजय पटले तर देवकरण कटरे यांनी मांनले.