वेगळ्या विदर्भाचा आंदोलनाला गालबोट,सर्वत्र काळ्या फिती लावून ध्वजारोहण

0
10
सिंIMG-20160501-WA0095देवाहीतही वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकला
गोंदियात ध्वजारोहणा आधीच विदर्भवाद्यांना अटक
यवतमाळात 5 बसची तोडफोड
जिवती येथे रॅलीतून विदर्भाची मागणी
गोंदिया-नागपूर,दि.1-वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज विदर्भवाद्यांच्यावतीने विदर्भात वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना स्वतंत्र विदर्भवादी नेते मात्र आजचा दिवस विदर्भात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.
नागपूरात विष्णुजी की रसोई, बजाजनगर चौक नागपूरमध्ये राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि अन्य नेत्यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला. श्रीहरी अणे यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला.

तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन यवतमाळ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याने 5 बसेसचे नुकसान झाले आहे.त्यातच विदर्भवाद्यांनी भाजपच्या निवडणुकीतील जाहिरनाम्याची होळी करुन शासनाचा व भाजपचा निषेध नोंदविला.विदर्भातील 11 जिल्हाच्या 24 ठिकाणी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला.गोंदिया येथील गांधी चौकात विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यासाठी जात असलेल्या विदर्भवाद्यांना पोलीसांना वाटेतच पकडून पोलीस ठाण्यात नेले.गडचिरोलीमध्येही विदर्भाचा झेंडा फडकवला पोलीसांनी केली अटक तर शिवसेनेने लावले अनेक ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे झेंडे.तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे काळ्याफिती लावून ध्वजारोहण करण्यात आले.जिवती येथे रॅली काढण्यात आली.तर बुलडाणा येथेही विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला.

माजी मंत्री नितीन राऊत यांनीही या आंदोलनात उडी घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे निवेदन केले आहे. महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाच्या कायमस्वरूपी स्मृती जपणार आहेत. परंतु महाराष्ट्रात सहभागी होताना झालेली जखम विदर्भाच्या मनात भळभळत आहे. त्यामुळे हि जखम मिटवून ‘विदर्भ दिन’ साजरा करण्याचे भाग्य वैदर्भीयांना द्यावे, असे निवेदन या पत्रात माजी मंत्री नितिन राऊत यानी केले आहे.
गोंदियामध्ये अॅड.टि.बी.कटरे,छैलबिहारी अग्रवाल,अॅड.अर्चना नंदागळे,पांडे आदी सहभागी झाले होते.चंद्रपूरात अनिल दिकोंडवार, जिल्हा अध्यक्ष किशोर पोतनवार, दिवाकर माणूसमारे, मितीन भागवत, किशोर दहेकर, वसंता चांदेकर तर गडचिरोली जिल्ह्यात विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, अरूण मुनघाटे, सुरेश पोरेड्डीवार, रमेश भुरसे, विजय कोतपल्लीवार, अ‍ॅड. संजय ठाकरे, रोहिदास राऊत, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, नामदेव गडपल्लीवार, अमिता लोणारकर, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर जक्कनवार, शालीक नाकाडे, दादाजी चापले, चंद्रशेखर भडांगे, एजाज शेख, समय्या पसुला, रमेश बारसागडे, प्रभाकर गव्हारे, सुधाकर नाईक, जगदीश म्हस्के, शरद ब्राह्मणवाडे, भास्कर कोठारे, प्रभाकर वासेकर, खुशाल वाघरे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, विवेक चटगुलवार, पांडुरंग भांडेकर, गोविंदराव बानबले, दादाजी चुधरी, सिद्धार्थ नंदेश्वर, सुरेश मांडवगडे, जनार्धन साखरे, नामदेव खोब्रागडे, श्याम वाढई वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले होते.ane 1