अदानी फाऊंडेशनच्यावतीने विविध प्रकारच्या वृक्षांचे वाटप

0
16

तिरोडा,दि.30- अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा राबविण्यात येत असलेल्या ‘वृक्ष से विकास’ या कार्यक्रमांतर्गत तिरोडा तालुक्यातील 50 गावातील 300 शेतकऱ्यांना आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सागवान, बकान, मोहगणी, ताम्हण, अशोका यासारख्या फळ झाडे तसेच इमारती लाकूड देणाऱ्या झाडांचा वाटप अदानी पावर प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
अदानी फाउंडेशन हेड बीमुल पटेल यांनी अदानी समूहाचा 2030 पर्यंत एक ट्रिलियन वृक्ष लागवड मोहिमेत या उपक्रमाद्वारे हातभार लागेल व पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची संख्या वाढविण्यास वृक्ष से विकास हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल असे सांगितले.
तसेच अदानी फाउंडेशन चे कार्यक्रमाधिकारी कैलास रेवतकर यांनी वृक्ष से विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फळझाडे व इमारती लाकूड देणाऱ्या झाडांची लागवड केल्याने त्यांना अधिकचे उत्पादन मिळेल व तसेच पर्यावरण रक्षणाकरिता हातभार लागेल या उद्देशाने अदानी फाउंडेशन द्वारा आम्ही हा उपक्रम राबवित आहोत असे सांगितले.