41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ महसूल सप्ताहनिमित्त जे.एम.पटेल महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रम

महसूल सप्ताहनिमित्त जे.एम.पटेल महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रम

0
13

blank

भंडारा दि. 7: :  राज्यभरात सुरू झालेल्या महसूल सप्ताहानिमीत्त भंडारा जिल्ह्यातही विविध उपक्रम घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज जे.एम.पटेल महाविद्यालय येथे ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभय नावंदर, जे.ऐम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य       श्री. ढोमणे, आपत्ती व्यवस्थापनाचे अभिषेक नामदास उपस्थीत होते.

या युवा संवाद कार्यक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे अभिषेक नामदास यांनी वीज पडणे, पुर येणे, आग लागणे, भुकंप येणे अशा प्रकारची आपत्ती आलीतर त्याचा सामना कसा करायला पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर धडे दिले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank