विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्ल्यांना विशेष पुरस्कार

0
3

 गोंदिया,दि.28 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश/ राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इत्यादींना अशा कार्याबद्दल तसेच वर्ष 2022-2023 मध्ये दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/माजी सैनिकांच्या पाल्ल्यांना विशेष गौरव पुरस्काराने व 10 हजार रुपये देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

          तरी  गोंदिया जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/पत्नी, माजी सैनिकांच्या पाल्ल्यांस शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डात 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले असतील त्यांनी त्यांचे अर्ज आणि दहावी व बारावी बोर्डाचे मार्कशीट तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन 15 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गोंदिया येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे. तसेच IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्ल्यांना 25 हजार रुपये देवून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर 2023 नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.