काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कारला अपघात

0
11

गोंदिया-गोरेगाव मार्गावरील घटना : सुदैवाने जीवितहानी नाही

गोंदिया, ब्. गोंदिया येथे काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी येत असलेल्या नागपूर व भंडारा येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कारला रानडुक्कराची धडक बसून अपघात झाला. ही घटना गोंदिया –गोरेगाव मार्गावरील ढिमरटोली/मिलटोली परिसरात आज सोमवारी, 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. यावेळी सुदैवाने कारचे सर्व सहाही एअरबॅग उघडल्याने कारमधील सर्वजण बचावले.या वाहनात प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी नाना गावंडे सह इतर पदाधिकारी होते