धनंजय रिनायत यांचा पुढाकार
गोंदिया : फत्तेपूर-ओझाटोला रस्त्याची दुरवस्था झाली होती. फत्तेपूर गावाजवळील नाल्यापासून सदर रस्ता पूर्ण खचून गेला होता. यामुळे वाहतूक प्रभावित होवून नागरिकांना फटका बसत होता. तसेच नजिकच्या डोंगरगाव येथे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला समोर जावे लागत होते. या संदर्भात मुख्याध्यापक व विद्यार्थिनींनी सामाजिक कार्यकर्ता धनंजय रिनायत यांना या प्रकाराची माहिती दिली. यावर रिनायत यांनी आपल्यास्तरावर पाठपुरावा केला. यामुळे सदर रस्त्याची २४ तासात दुरूस्ती करण्यात आली आहे.
फत्तेपूर-ओझाटोला रस्ता दुरवस्थेला आला आहे. या रस्त्यावर फत्तेपूर गावाजवळ असलेल्या नाल्यापासून रस्ता खचून गेला होता. यामुळे वाहतूक प्रभावित होवून नागरिकांसह, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला होता. फत्तेपूर येथून उच्चशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नजिकच्या शाळा, महाविद्यालयामध्ये जाताात. पण रस्ता पूर्ण खचल्याने समस्या निर्माण झाली होती. त्यातच नजिकच्या डोंगरगाव येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फत्तेपूर येथून जवळपास ७५ विद्यार्थिनी शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थी कोंडी होवून शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थिनींनी याची माहिती मुख्याध्यापकांना दिली. यावर मुख्याध्यापक यांनी सामाजिक कार्यकर्ता धनंजय रिनायत यांना या प्रकाराची माहिती दिली. रिनायत यांनी तत्काळ या संदर्भात दखल घेत आपल्यास्तरावर पाठपुरावा केला. दुरवस्थेला आलेल्या रस्त्याची अवघ्या २४ तासात डागडुजी करून वाहतुकीस मोकळा केला. २४ तासात सदर मार्ग दुरूस्त करून दिल्याबद्दल विद्यार्थींनी धनंजय रिनायत यांचे आभार मानले.