ईळदा येथील आरोग्यवर्धिनी केंद्र त्वरित सुरू करा – नागरिकांची मागणी

0
23

माजी मंत्र्यांना दिले निवेदन
*अर्जुनी मोर ( सुरेंद्रकुमार ठवरे )–ईळदा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाकडून भव्यदिव्य प्रशस्त इमारत बांधकाम प्रथमिक आरोग्य केंद्राकरीता मंजूर करण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षाचा प्रचंड मोठा काळ लोटला तरी आतापर्यंत लोकार्पण करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील जनतेला उपचारासाठी बरीच पायपीट करावी लागत आहे. लोकार्पणाअभावी समाज विघातकांच्या माध्यमातून इमारतीची बरीच तोडफोड झाली असुन इलेक्ट्रॉनीक सामानांची नासधूस यासारखे दुर्दैवी प्रकार घडले आहेत. याची शासनाने गांभीर्याने लक्ष देने गरजेचे होते. असे असताना सुद्धा शासन स्तरावरून कुठलीही उपाययोजना करत असल्याचे दिसून येत नाही.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या इमारतीकडे आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.या शासनाच्या निष्काळजीपणाविरुद्ध कन्हाळगाव येथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देऊन दवाखान्याचे तात्काळ लोकार्पण करण्याची मागणी केली आहे.

“ ईळदा येथे मंजूर असलेले इलेक्ट्रिक पॉवर हाऊस,कन्हाळगाव ते कुरखेडा मार्गाचे रस्ता बांधकामास मंजुरी देणे यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करून मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विविधकांना दिले आहे. निवेदन देताना परिसरातील नागरिक ग्रा.पं. सरपंच निशा दुर्वे; माजी पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, उपसरपंच टोलीराम कापगते, लोकचंद पर्वते, शामराव धुर्वे, वसंता मुकेटि आदी नागरिक उपस्थित होते. “