35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ रानडुकराचा हल्ल्यात तिघेजन जखमी

रानडुकराचा हल्ल्यात तिघेजन जखमी

0
16

blank

सालेकसा: तालुक्यातील भजेपार माताटोला येथे शेतशिवरातून गावात शिरलेल्या रानडूकराने अचानक हल्ला चढवत तीन लोकांना जखमी केले. ही घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास माताटोला येथे घडली. जखमी झालेल्या व्यक्तींची नावे रमेश महारावडे ( वय 50), ओमप्रकाश चुटे (वय 35) आणि मधुकर बहेकार (वय 51) सर्व रा. माताटोला भजेपार अशी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव आणि ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान जवळपास दिड तास एका घरात दबा धरून बसलेल्या रानडूकराने शेत शिवाराकडे पळ काढला. पंचनामा करण्यात आला असून वन विभागाने जखमींना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

blank