खासदार सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचा दबदबा

0
15

..चंद्रयान,देशभक्ती,जोगवा आणि लावणीच्या रसात प्रेक्षक मंत्रमुग्ध..
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-जय बिरसा,जय सेवा,जय पेरसाबेन,जय बुढालपेन,बिरसा तुम्हे आणा होगा या जय घोषाने नगर दुमदुमले.भारत माता की जय,मेरा रंग दे बसंती चोला,सबसे आगे होंगे हिंदुस्तानी या स्वरांनी वातावरण देशभक्तीमय झाले. विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल,उदे ग अंबे उदे या भक्तीरसाने अवघी जेजुरी आणि पंढरी अवतरली.नृत्य, जोश,जल्लोष आणि संस्कृतीचे जिवंत चित्रण हे क्षणचित्रे आहेत येथील प्रसन्न सभागृहात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे.
केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय,वैनगंगा पांगोली सांस्कृतिक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव पर्वावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवात तालुक्यातील स्पर्धकांनी लोक कलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या महोत्सवात आदिवासी नृत्य आणि लोककलेचा दबदबा दिसून आला.आदिवासी नृत्य आणि लोककलांचा प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन मनमुराद आनंद लुटला.स्पर्धकांचे सादरीकरण बघून अनेकांचे पाय थिरकले. बदलते युग आणि आधुनिकरण यामुळे आपली संस्कृती, लोककला लुप्त होत आहेत.या कलांना जिवंत ठेवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात खा.सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने घेण्यात आले.या महोत्सवात पारंपारिक नृत्य महिला महोत्सव आणि युवा महोत्सव अशी वर्गवारी करण्यात आली होती.या स्पर्धांमध्ये तालुक्यातील तब्बल ३१ चमुंनी सहभाग घेतला. यापैकी २० चमुंनी आदिवासी लोककलेचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण या महोत्सवात झाले.या महोत्सवात विजेत्या चमूंना पुरस्कार घोषित करण्यात आले.पारंपारिक नृत्य प्रकारातील प्रथम पारितोषिक पारंपारिक आदिवासी ग्रुप कन्हाळगाव,व्दितीय जय माँ सरस्वती ग्रुप ईलदा,तृतीय श्रीमती मालिनीताई सुखदेवराव दहिवले आदिवासी आश्रम शाळा एरंडी तर युवा महोत्सव प्रकारात
प्रथम जी एम बी हायस्कूल अर्जुनी मोरगाव,द्वितीय सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ताडगाव,तृतीय मिलिंद सांस्कृतिक मंडळ चान्ना बाक्टी आणि महिला महोत्सव या प्रकारात प्रथम भारत माता ग्रुप अर्जुनी मोरगाव,द्वितीय अंगणवाडी सेविका ग्रुप अर्जुनी मोरगाव, आणि तृतीय क्रमांक योगा ग्रुप अर्जुनी मोरगाव यांनी पटकावला.विजेत्या चमूंची घोषणा खा.सुनील मेंढे,माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या विजेत्यांचे अंतिम सामने साकोली येथे होणार आहेत. यामध्ये विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण होणार आहे.जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन जि प सदस्य रचना गहाणे यांनी केले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष विजय कापगते,शुभांगी मेंढे,जीप सदस्य जयश्री देशमुख,नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे,पस सदस्य नूतनलाल सोनवाणे,डॉ.गजानन डोंगरवार,लैलेश्वर शिवणकर,रत्नदीप दहिवले,सुदाम कोवे,रामलाल मुंगणकर,तेजुकला गहाने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता भय्या, संचालन आभार डॉ.नाजूक कुंभरे यांनी केले. यशस्वीतेसाठी मीना शाहारे, गीता ब्राह्मणकर,पराग कापगते,अविनाश कापगते,कुंदा डोंगरवार,शोभा गंथडे,मंजुषा तरोणे,रचना वकेकार,अर्चना झेलकर,उमेश तवाडे यांनी सहकार्य केले.