*संपुर्ण प्रकरणांमध्ये रक्कम रु. 1117379/- रुपयांची केली दंडात्मक वसुली*.
देसाईगंज
तालुका विधी सेवा समिती देसाईगंज अंतर्गत खटला पूर्व प्रकरणे नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणांत वादी व प्रतिवादी यांच्यातील वाद समोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी 09 सप्टेंबर 2023 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, देसाईगंज येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये एकुण 40 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. संपुर्ण प्रकरणांमध्ये रक्कम रु. 1117379/- रुपयांची वसुली करण्यात आली.
या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये खटलापुर्व 19, नियमित फौजदारी व दिवाणी खटला प्रकरणांचे 21 मामले असे एकुण 40 मामले मिटवून यात एकुण 1117379/- रुपये वसूल करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीला पॅनल प्रमुख म्हणून श्री डी.डी.मेश्राम, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे. चामोशी, पॅनल सदस्य अधिवक्ता ॲड संजय गुरू हे प्रामुख्याने उपस्थित होते
तसेच ॲड मंगेश शेंडे, अँड बी. एम. बांबोळकर, ॲड लाँगमार्च खोब्रागडे, अॕड दत्ता पिलारे, ॲड प्रमोद बुध्दे व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील वित्त / आस्थापना विभागाचे सहाय्यक अधिक्षक सौ.के.डी, कुकडकर,लघुलेखक टेमकर, वरिष्ठ लिपीक चेतन भुर्रे, कनिष्ट लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक मिलींद तिरमलवार, श्रीमती एस. यु. गावंडे, कनिष्ठ लिपीक सौ.आर.आर.परसा,
शिपाई अंकुश मच्छीरके, शिपाई पुष्पा दासरवार, कारकुन प्रविण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणांचा लवकर लागत असल्याने दिवसेंदिवस निपटारा लोकअदालतीत ठेवण्यात येणा-या प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे.