बिरसी विमानतळावर प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

0
14

गोंदिया : बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही. समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा बिरसी विमानतळावर धडकलेल्या १०६ कुटुंबातील प्रकल्पग्रस्तांनी दिला. सोमवारी (ता. ११) गावातून विमानतळाच्या गेटपर्यंत मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

अतिक्रमण आणि अन्य काही कारणे सांगून शासन व विमानतळ प्रशासनाने काही वर्षांपूर्वी १०६ जणांची घरे तोडली. या सर्व कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. परंतु, अद्यापही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. इतकेच नव्हे, अनेक समस्या कायम असताना आश्वासनापलिकडे कुठलाही तोडगा काढला जात नाही.
, शासन, प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करत सोमवारी बिरसीवासींनी गावातून थेट विमानतळाच्या गेटपर्यंत मोर्चा काढला. निदेशकांच्या नावे निवेदन दिले. येत्या काही दिवसांत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मोठे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही बिरसीवासींनी दिला. मोर्चात बिरसी गावातील प्रेमलाल तावाडे, अनंतराम डोये, गजानन तावाडे, दुलीचंद तावाडे, क्रिष्णा राय, मन्साराम मेंढे, जयेंद्र वंजारी, सुकलसिंह नैकाने यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.