कुणबी समाज संघर्ष कृती समितीने पाठविले निवेदन

0
11
गोंदिया ः मराठा समाजास आरक्षण देण्यासंबंधी कुणबी समाजाचा विरोध नाही. परंतु, कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा तिव्र विरोध आहे.
शासनाने भविष्यात मराठा आणि कुणबी समाजात वाद निर्माण होईल, असा निर्णय करू नये आणि ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणात समाविष्ट करू नये.
शासनाने कुणबी समाजाबाबत अनुचित निर्णय घेतल्यास मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा कुणबी समाज संघर्ष कृती समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना  पाठविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना रमेश कुथे, गजेंद्र फुंडे, लिलाधर पाथोडे, दुलिचंद बुधे, मोरेश्वर कुथे, श्रावण सिंगणजुडे, राम गायधने, रूपेश निंबार्ते, मनोहर मेंढे, अंकित कोरे, राजकुमार कुथे, राजेश चतुर, शैलेंद्र फुंडे, रूपेश कुथे, राजेश तावाडे, राहूल फेंडारकर, गजेंद्र बांते, मुकेश राखडे, रामकृष्ण चौधरी उपस्थित होते.