रामदयाल पटले यांचा शेतात पडून मृत्यू

0
8

तिरोडा- तालुक्यातील नवेगाव येथील शेतकरी रामदयाल पटले (वय 49) शेतामध्ये पिकाची पाहणी करण्याकरता शेतावर गेले असता धुऱ्यावरून पाय घसरून पडले. शेतातील पाणी त्यांच्या नाकात तोंडात जाऊन ते जागीच मरण पावले.
घरच्यांना लोकांनी बराच वेळ होऊन ते परत आले नाहीत म्हणून शेतात शोध घेतला. तर ते उपडे पडलेले दिसले. नवेगाव येथील सरपंच दुर्गाबाई नागदेवे यांनी तिरोडा पोलीसांनामाहिती दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. ठाणेदार देविदास कठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल धावडे व अंबादे पुढील तपास करीत आहेत.