गोंदिया तालुकास्तरिय आयुष्यमान भव मोहिमेचे शुभारंभ

0
9

निक्षय मित्र व टीबी चॅम्पियन यांचा सत्कार लक्षवेधी ठरले
गोंदिया-आयुष्यमान भव मोहिम संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. गोंदिया तालुक्यात दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोंदिया येथे पंचायत समिती सभापती  मुनेश्वर रहांगडाले ,पंचायत समिती सदस्य स्नेहा गौतम ,सरपंच मिलन रामटेककर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी खंड विकास अधिकारी आनंद पिंगळे,  बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश सोनटक्के,  विस्तार अधिकारी तीर्थराज उके  उपस्थित होते.
सदर मोहिम दरम्यान देण्यात येणार्या आरोग्य सेवांची माहीती गोंदियाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी प्रस्तावना सादर केली त्यात प्रामुख्याने पाच लाखापर्यंतचे उपचार लोकांना मोफत मिळण्याच्या द्रुष्टिकोनातुन लोकांना आरोग्य विमाचे कवच आयुष्यमान कार्ड बनविणे ,आभा आयडी तयार करणे, आयुष्यमान सभेच्या माध्यमातुन ग्रामपातळी वर गावोगावी ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समितिच्या मार्फत जनजाग्रुती करण्यात येणार आहे. गावातील लोकांना असंसर्गजन्य रोग, सिकलसेल,क्षयरोग, लसीकरण व इतर आरोग्य सेवा जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्यमान मेळावा दर आठवडी शनिवारी ला मेळाव्याचे आयोजन करून वेगवेगळ्या थीम नुसार आरोग्य सेवा पुरविणे, प्राथमिक शाळा शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी व गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा पुरवणे याबाबत सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहीति डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली.
आयुष्यमान भव मोहिमेच्या तालुकास्तरीय शुभारंभ कार्यक्रम समारंभाचे अनुषंगाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्डचे वितरण, व क्षयरुग्णास उपचारासोबत पोषक आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान मोहिमेंतर्गत क्षयरुग्णास उपचारासोबत अतिरिक्त पोषण आहार किट देवून सहकार्य केल्याबद्दल निक्षय मित्र गोंदिया मेमोरियल बहुउद्देशीय संस्थेचे प्रकाश अग्रवाल, प्रमोद अग्रवाल व युनायटेड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन केलंका यांसर्वांना प्रमाणपत्र वितरण करुन गौरविण्यात आले तसेच टीबी चॅम्पियन यांचा सत्कार व सामूहिक अवयवदान शपथ घेण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री पवन वासनिक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश चिंधालोरे, रवींद्र जाधव, प्रितेश मेश्राम, लोणारे व उर्मिला बघेले ह्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तालुकास्तरिय कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.