ओबीसीची भूमिका समजून न घेतल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील

0
7

.ओबीसी संघटनांची भूमिका
यवतमाळ- भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली ,व ओबीसी जन मोर्चा ,ओबीसी वि, जे .एनटी,एसबीसी अलुतेदार, बलुतेदारांचे संघटन महात्मा फुले समता परिषद,यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन, मोर्चा आंदोलन, निवेदन आंदोलन, 17 नोव्हेंबर 2023 रोजी करण्याचे निर्देश दिले गेले. त्यानुसार ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये ,राज्य सरकारने घोषित केलेले बहात्तर वस्तीगृह तात्काळ लागू करावे.21 हजार 600 विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, 52 टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण द्यावे, या मागणी करता महात्मा फुले चौक ,महात्मा फुले पुतळा ,आझाद मैदान जवळ धरणे आंदोलन आयोजित केल्या गेले. सदर धरणे आंदोलनामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे ,विलास काळे ,प्रवीण भोयर ,इंजिनिअर अरुण सांगळे ,एम के कोडापे ,डॉक्टर दिलीप घावडे,पुरुषोत्तम ठोकळ, विजय लांडे ,गजानन गुल्हाने ,विनोद इंगळे ,रवींद्र गुल्हाने, दिवाकर राऊत ,शशिकांत लोळगे,सोनाली खंदारे बोरकर ,माया गोरे ,सुनीता काळे वर्षा मेत्रे ,प्राध्यापक सविता हजारे ,अतुलकुमार सारडे ,मनोज पाचघरे ,शशांक केंडे, गजानन जयसिंगकार ,तुळशीराम धामणकर ,सचिन बोराडे, विकास दरने, नीता धरणे माधुरी फेन्डर, वैशाली पुसे ,महेंद्र वेरुळकर, संजय कावलकर, हरीश कुडे, हाजी खलील शेख, गोविंद चव्हाण, प्राध्यापक वर्षा निकम, लीना तुरकर, दीपक वाघ, मुकुंदराव दारोळे, मीना सांगळे, सुनील बोरकर ,हिरालाल गायकवाड, उल्हास निनावे, मोहन लोखंडे, मीना सांगळे नरेंद्र परोपटे ,प्राध्यापक रमेश जोल्हे, राजू देशमुख ,उमेश मेश्राम, सुनेना येवतकर, संजय बोरकर विशाल राऊत आधी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .