मौदा,दि.33ः तालुक्यातील खात येथे पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत संजय काणतोडे (जिल्हाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड,नागपूर) यांच्या मार्गदर्शनात व जगदिश वाडिभस्मे (तालुकाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड, मौदा) यांच्या नेतृत्वात मौदा तालुक्यातील खात येथील माजी सरपंचसह शेकडो नागरिकांचा संभाजी ब्रिगेड पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी ईश्वर डहाके (तालुकाध्यक्ष-मराठा सेवा संघ, मौदा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शंकर वैद्य (माजी सरपंच),उमेश काटकर,नरेश वाकालकर,सुशील वाहने,कमलेश लोहबरे,गणेश बावनकुळे,उमेश डोकरीमारे, गणेश गिऱ्हेपुंजे, अंकुश वैद्य,अतुल समरीत, करन चाफले, शामलाल गिऱ्हेपुंजे, राकेश भुरे यांच्यासह गावातील नगरिक उपस्थित होते.