अर्जुनी मोर. :— तालुक्यातील जयदूर्गा हायस्कूल एवं ज्यू. कॉलेज गौरनगर येथे वर्ग ५ ते ८ तसेच वर्ग ९ ते १२ साठी तालुकास्तरीय योगासन स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेचे उ्घाटन पोलिस स्टेशन अर्जुनी मोर. चे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अशोक चांडक होते .
यावेळी गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर.चे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत लाडे, ग्राम पंचायत सदस्य कु. तिर्थेश्वरी पोवडे, कु. खुशबू बरैय्या, गट्साधन केंद्र विषय शिक्षक सत्यवान शहारे प्रामुख्याने उपस्थित होते.सुरुवातीला स्पर्धा आयोजनामागची पार्श्वभूमी आणि उद्देश यावर शाळेचे प्राचार्य सुनील कुमार पाऊलझगडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रकाश टाकला.
योगासन स्पर्धेमध्ये विविध विद्यालयाच्या ५२ स्पर्धकांनी तर सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी कठीण परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या खुशबू बरैय्या हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच सेवाकालात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक विलास नाळे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत लाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
योगासन स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावचे विद्यार्थी कुलदीप राहुल ब्राह्मणकर, कु.रिया देवा नाकाडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला तर वरिष्ठ गटामध्ये कु. गुंजन हेमंत कुमार कापगते व सिद्दीविनायक पब्लिक स्कूल अर्जुनी मोर. ची विद्यार्थिनी कु.जानवी प्रमोद कापगते यांनी यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांना २००१ व १००१ असे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कांतीकुमार बोरकर यांनी केले तर भुवेंद्र चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानले.