गडचिरोली,दि.24ः- फुले दाम्पत्य प्रतिष्ठाण,गड येथे सत्यशोधक स्थापना दिन निमित्य सामाजीक प्रबोधन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार भिमराज पात्रिकर यांनी उपस्थितांना सत्यशोधक संघटन स्थापनेचा इतिहास, तिचे उद्दिष्टे, काळाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये 12 वी विद्यार्थी निकेतन आढाव, 92.60, प्रांजली शेंडे, 76.83, प्रतिक्षा मोहुर्ले, 76:67,10 वीतील श्रेया मोहुर्ले 88:60, तुळशी महाडोरे 88:20, अपेक्षा गुरनुले, 87:20 सुमित मोहुर्ले 87:00, सुषमा इंगोले 86:80, तनुजा कोकोडे 85:60, साईश्वर लांबाडी 85:60, वैष्णवी ठाकरे 85:00, मेघा लेनगुरे 84:40, प्रेमसाई लांबाडी 84:20, विशाखा मोहुर्ले 84:00, रेणुका चौधरी 83:20, कुंकुम मोहुर्ले 83:20, साहिल निकोडे 83:06, तनुजा गावतुरे 83:00, विश्रांती वाडगुरे 81:40, वैष्णवी मोहुर्ले 81:00, श्रेयस मोहुर्ले 80:80, वेदांत गुरनुले 80:20, उत्कर्ष वाढई 80:20, कशिष गुरनुले 80:60, भारत शेंडे 80:00 तसेच विशेष प्राविण्य सत्कारमुर्तीमध्ये डाॅ. विपीन राऊत यांना चंद्रपूर जिल्ह्यातील कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विकासाचा स्तर : एक कालिक व अभिक्षेत्रीय विश्लेषणसाठी ph.d,डॉ. संदेश सोनुले यांना पूर्व विदर्भातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी अध्यापन प्रभावशिलता, व्यावसायिक ताण आणि भूमिका द्वंद्वचा चिकित्सक अभ्यास ph.d,डॉ. प्रेरणा सोनुले यांना Image of sage in Indian Novel साठी ph.d, आकांक्षा निकोडे,रामनगर गड. 8वी (नासा परिक्षा उतिर्ण),अभिषेक गजानन मोहुर्ले, नवेगाव अहेरी (सेट परिक्षा उतिर्ण),रजत रमेश जेंगटे, मुरखळा (अॅग्रीकल्चर पदवीकेत प्राविण्य) यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष संंघटनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद गुरनुले होते.तर प्रमुख पाहुणे रमेश लंबाडी सिरोंचा, सुधा चौधरी, पुरण पेटकुले, लक्ष्मण मोहुर्ले होते. प्रास्तावना रमेश जेंगठे, संचालन गिरीष लेनगुरे व आभार मनोज सोनुले यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-पालक व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.