देवरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर शिबीराचे थाटात आयोजन

0
8

■ या शिबीराचा एकूण ४५० विद्यार्थी व पालकांनी घेतला लाभ.

देवरी, दि.२४: देवरी तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समिती तथा शिक्षक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देवरी-चिचगड मार्गावरील जि.प.हायस्कूल च्या साने गुरुजी सभागृहात रविवार (दि.१७ सप्टेंबर) रोजी सकाळी १० ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर शिबिराचे थाटातआयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्धाटन जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक मंगलमूर्ती सयाम यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त प्राचार्य के. सी. शहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील इन्कम टॅक्स एडिशनल कमिशनर धनंजय वंजारी, लंडन येथील किंग्ज कॉलेजचे संदीप बडोले, गोंदिया येथील जिल्हा सांख्यिकी अधिकारी डॉ. रूपेश राऊत, आणि.स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर रविकुमार कराडे,सी.डी.पी.ओ.श्री सोनटक्के व डॉ. सुधीर मुनेश्वर आदिंनी समग्र महापुरुषांच्या वैचारीक क्रांतीतून प्रेरणा घेऊन स्पर्धेच्या युगात ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी व युवकांमध्ये स्पर्धा परीक्षेची माहिती व जाणीव जागृती व्हावी या उदात्त हेतूने वर्तमान काळातील सध्याची स्थिती आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिबीरार्थ्यांना स्पर्धा परीक्षे बाबद मार्गदर्शन केले.

या शिबीरात जवळपास ४५० विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला. या शिबीराच्या आयोजनाकरीता देवरी येथील सेवा निवृत्त शिक्षक आनंद सतदेवे, प्रा. कु.सुनंदा भुरे, रामेश्ववर वाघाडे सर, क्रुष्णा ब्राम्हणकर, मेघनाथ भांडारकर सर, दिक्षांत धारगावे सर, मिलींद दामले सर, किरण रामटेके, संदिप तिडके सर, चेतन उईके सर, राहुल गणवीर सर, राजू बंसोड, अमित वालदे,श्रीराम नंदेश्वर, प्रकाश गावडकर सर तथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शिक्षक एकता मंच मित्र परिवारांनी सहकार्य केले.