गोंदिया,दि.26 : गोंदिया जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसी आरक्षणाला घेवून उद्भवलेली स्थिती तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तसेच समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेवून ओबीसी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 सप्टेबंरपासून साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली असून या साखळी उपोषण आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंंढे हे आज(दि.26)साखळी उपोषण मंडपाला भेट देणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसींना एकही जागा देण्यात न आल्याने जिल्ह्यातील ओबीसीमध्ये आक्रोश दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने जन आक्रोश मोर्च्यात देण्यात आलेले आश्वासनाची पुर्तता न करता वेेळकाढू धोरण राबविले जात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेले साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.आज या आंदोलनात ओबीसी समुहातील वकिलांनी सोमवारला(दि.25) हजेरी लावूून आपले समर्थन जाहीर केले.