कृउबासमध्ये नविन धानाची आवक सुुरू शेतकर्‍याला चांदीचा शिक्का भेट

0
6

गोंदिया : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नविन धानाची आवक सुरू झाली आहे. आज (ता.२६) कामठा व सेंद्रीटोला/ पिंडकेपार येथील शेतकर्‍यांनी धानविक्री केली. धानाला २००१ रूपये भाव मिळाला. यावर कृउबासकडून शेतकर्‍यांचा शाल, श्रीफळ व चांदीचा शिक्का भेट देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कृउबासचे सभापती भाऊराव ऊके, उपसभापती राजकुमार (पप्पुभाऊ) पटले, संचालक जितेश टेभंरे, राधाकृष्ण ठाकुर, विजय उके, सचिव सुरेश जोशी, धान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आनंद जैन व व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. हंगामात प्रथमच सेंद्रीटोला/पिंडकेपार व कामठा येथील शेतकर्‍यांने धानविक्री आणले. दोन्ही शेतकर्‍यांच्या धानाला २००१ रूपये भाव मिळाला. तसेच धानविक्री केल्याबद्दल कृउबासतर्पेâ दोन्ही शेतकर्‍यांचा शाल, श्रीफळ व चांदीचा शिक्का भेट देवून सत्कार करण्यात आला. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी कृउबासमध्ये धानविक्री करून योग्य भाव मिळवावा, असे आवाहन सभापती, उपसभापतीसह संचालक मंडळाने केले आहे.
००००००