जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत ३ ऑक्टोबरला कार्यशाळा

0
12

गोंदिया, दि.27 :  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव विहीत वेळेत प्राप्त व्हावेत व त्यांना विहीत वेळेतच जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यादृष्टीने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व प्राचार्य तसेच संबंधीत कर्मचारी यांची ०३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला दुपारी १२ वाजता समाज कल्याण कार्यालय, गोंदिया येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

          महाविद्यालयील विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करतेवेळी घ्यावयाची दक्षता, प्रस्ताव सादर करतांना लागणारे कागदपत्रे, अर्ज सादर करण्याबाबतचा कालावधी इत्यादी विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदियाद्वारे गोंदिया जिल्ह्यातील सर्वसाधारण अधिवास असणाऱ्या सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील इयत्ता १२ वी च्या विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागास प्रवर्गाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे (अनुसूचित जमाती वगळता) जात प्रमाणपत्राची पडताळणी नियमीतपणे करण्यात येत आहे. याबाबतही काही अडचणी असल्यास त्या या कार्यशाळेत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

      जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व प्राचार्य, संबंधीत कर्मचारी यांनी ०३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला दुपारी १२.०० वाजता समाज कल्याण कार्यालय, गोंदिया येथे आयोजित कार्यशाळेला वेळेवर उपस्थित राहावे. तसेच जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशीत इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची माहीती मागविण्यात आली होती. काही महाविद्यालयाची माहीती अद्यापपर्यंत कार्यालयात सादर करण्यात आलेली नाही. तथापी, आपल्या महाविद्यालयांची जातीनिहाय माहितीसुध्दा मंगळवारच्या आयोजीत कार्यशाळेत सादर करावी, असे आवाहन उपायुक्त जात पडताळणी राजेश पांडे यांनी केले आहे.