अर्जुनी मोर.- तालुक्यातील गोठणगाव येथे महिला व बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून पोषण मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे व विज्ञानाचे युग आहे.या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असताना वेळेवर आहार घेण्यास विसरतो.त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो व रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची भिती असते.म्हणुन प्रत्येक व्यक्तीने आपला आहार वेळेवर घ्यावा.
त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींनी आपल्या आहारात जास्तीत जास्त पोषक पदार्थांचा सेवन करावा.गरोदर व स्तनदा माता यांनी सकस आहार घ्यावा जेणेकरून आपले बाळ सुदृढ व निरोगी राहिल.दैनंदिन जीवनात बरेच लोक धावपळीचे जीवन जगतात आणि या धावपळीच्या जीवनात आपण आपले आरोग्य बिघडवत असतो त्यामुळे आपले शरीर निरोगी राहिल तर धावपळ करु शकतो.म्हणुन सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
सध्या पावसाचे दिवस आहेत दररोज वातावरणात बदल पहायला मिळतो त्या वायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.बरेचसे रोग पाण्यामुळे होणारे आहेत त्यामुळे पाणी उकळून घ्यावे.लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे पालेभाज्या व आपल्या ग्रामीण भागात मिळणाऱ्या रानभाज्यांचा समावेश आहारात करावा.असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय ईश्वार, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार ग्रामपंचायत सदस्य रतिराम कोडापे, मनोज रामटेके, सुनंदा काटेंगे, भुमिका कराडे,रीना राणे, कविता परतेकी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनाली दरेकर, परिचारीका राय, अंगणवाडी पर्यवेक्षिका कुंभरे, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तथा माता भगिनी उपस्थित होत्या.
निरोगी जीवन जगण्यासाठी सकस आहार काळाची गरज आहे:-इंजि.यशवंत गणविर
वाढदिवसाच्या शुभेच्छा