सेवानिवृत्त कर्मचार्यांना देणार न्याय-जिल्हाध्यक्ष अरूण पारधी

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचार्यांनी, स्विकारावे संस्थेचे सभासदत्व
गोंदिया,दि.01–सध्या गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात, कर्मचारी मोठ्या संख्येनी सेवानिवृत्त होत आहेत.
अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सुरक्षितता-पुर्तेते साठी,शासन दरबारी नोंदणीकृत स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध असणे गरजेचे होते.या अनुषंंगाने अरुण पारधी,आनंद बिसेन, श्री हनवते यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध व्यवस्थापनाच्या शाळेतून सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना एकत्रित करून ‘खाजगी शाळा सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुउद्देशीय संस्था गोंदिया र.न.000076/2023(गों),12/8/2023 ला  या संस्थेची स्थापना करण्यात आली.
या अधिकृत संस्थेद्वारा सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या शासन-प्रशासना समक्ष मांडून,त्या सोडविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अरूण पारधी यांनी केले.
या संस्थे द्वारा सेवानिवृत्त कर्मचार्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सुरक्षितता राखली जाणार असल्यांने सेवानिवृत्ती घेत असलेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या संस्थेचे सभासदत्व स्विकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी से.नि.मुख्याध्यापक बी.टी.काशीवार होते.या सभेचे आयोजन ता.30 सप्टेबंर रोजी श्रीमती विमलताई विद्यालय व विज्ञान,एम.सी.व्ही.सी क.महा.क॔टगीनाका गोंदिया येथे करण्यात आले होते.
जिल्हा कार्यकारीणीचे अध्यक्ष अरूण पारधी,सचिव आनंद बिसेन, उपाध्यक्ष मोहनलाल पटले,कोषाध्यक्ष उदेलाल हनवते,सदस्य भगवानसिंग चौव्हाण, सदस्य राजेंद्रसिंग तोमर उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सचिव आनंद बिसेन यांनी केले.या प्रसंगी सेवानिवृत्ती वेतनाचे गणन,कुटूंब निवृत्ती वेतनाचे गणन,आयकर बाबतीत घ्यावयाची दक्षता ई.बाबत जिल्हाध्यक्ष अरूण पारधी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सर्वानुमते गोदिया तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.यात अध्यक्ष एसॱएम पटले,उपाध्यक्ष आर.आर.बिसेन,सचिव एम.जी.हरिणखेडे,सह सचिव सी.ए.आम्बेडारे,कोषाध्यक्ष आर.आर.लांजेवार,सदस्य छनेश चव्हाण ,आर.जे.जचपेले,बी.टी.काशीवार,एस.एन.धोबे,सी.एच.मदनकर,के.जे.बघेले यांचा समावेश करण्यात आला.आभार श्री.हरीणखेडे यांनी मानले.