जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांची मोहाडी जिल्हा परिषद शाळेला भेट

0
10

गोरेगांव:– मुंडीपार जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी गोरेगांव तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेला आकस्मिक भेट दिली असता मोहाडी जि.प.शाळेतील शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
भेटी दरम्यान 100%शिक्षक उपस्थित होते.शाळेची पाहणी दरम्यान अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या.विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भौतिक सुविधेची पाहणी केली.
विध्यार्थ्यांना आपल्या गावाची, परिसराची ओळख करून द्या. त्यांना साधे-साधे प्रयोग करू द्या. पालकांचा सहभाग,गावचे सरपंच, पोलीस पाटील कोण आहेत यांची माहिती द्या.एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय आणी मा. जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मुलाखत घेऊ द्या.
तसेच पावसाळा सुरू असून विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी केल्या. सोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्य करण्याबाबत गरज पडल्यास मदत घेण्याचे आवाहन देखील केले. त्यावेळी उच्चक्षेणी मुख्याध्यापिका सौ.जी.बी.
रामकवार,सहाय्यक शिक्षक ए.के.वंजारी,सी.के.बिसेन,सौ.डी.बी.जयतवार,एस.व्ही.सोनकनवरे,टी.पी.डावकरे,
लेकेश कावळे,जितु कावळे उपस्थित होते.