गोंदिया,दि.02ः तालुक्यातील अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा येथे 02 आक्टोबंरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे होते.अतिथी म्हणून प्रमुख अतिथी श्रीमती अस्मिता मंडपे व सरपंच नोकचंद कापसे,उपसरपंच विठ्ठलराव हरडे,पोलीस पाटील अल्काताई रंगारी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष मळावी व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी मार्च 2023 मध्ये प्रथम आलेल्या गावातील वर्ग 12 वी चा विद्यार्थी आलोक वसंत रहमतकर व वर्ग 10 वीला प्रथम आलेला पराग राजेंद्र रहमतकर तसेच स्वामीं विवेकानंद विद्यालय कारंजा येथील प्रथम आलेली कु.आचल संकर टालटे या विद्यार्थ्यांचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सभापती संजय टेंभरे यांनी वाचनालयाचे कार्याबद्दल कौतुक करीत वाचनालय सुसोभीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष फनेंद्र हरिणखेडे,उपाध्यक्ष विठ्ठलराव हरडे,मारोती भिमटे,विजय वाघाडे,विनायक चव्हाण,सचिव टेकचंंद बलभद्रे व गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवलाल ढेकवार,श्रीराम रहमतकर,माजी सरपंच धनवंताबाई उपराळे,महेन्द्र शहारे, लोकेश उपराळे,अरविंद हरडे,मीताराम हरडे, गोपाल हजारे, राजू पेशने, कारुजी रहमतकर,डिगाराम डिबे,सेवानिवृत्त पर्यवेक्षक दिनेश रहमतकर,कन्हैयालाल रहमतकर,मनोहर बघेले,रामू उके व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चव्हाण यांनी केले.प्रस्तावना संस्थेचे सचिव टेकचंंद बलभद्रे यांनी केले व आभार संस्थेचे अध्यक्ष फनेंद्र हरिणखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला वाचनालयाचे ग्रंथपाल श्रीमती ममताताई रहमतकर शेखर उपराळे व सर्व ग्रामपंचायतींचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.