जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सह.पतसंस्थेची आमसभा उत्हासात

0
20

गोंदिया,दि.03ः– गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया र.नं.102 ची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (आम सभा) जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या विशेष उपस्थितीत नुकतीच पार पडली.यावेळी सेवानिवृत्त सदस्यांचा तसेच वर्ग 2 पदावर पदोन्नती झालेल्या सदस्यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.आर.खामकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी  जनार्दन खोटरे,शिक्षणाधिकारी कादर शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष मनोज एम गोंडाने,उपाध्यक्ष आनंदकुमार आर चर्जे, सचिव कमलेश बिसेन ,शाखाप्रमुख सचिन कुथे तसेच संस्थेचे संचालक कुवरलाल रहांगडाले, हंसराज गजभिये, ओमेश्वर बिसेन,रितेश कुमार शहारे, अजय कुमार रामटेके ,मनोज भुरे, वीरेंद्र कुंभरे, दिलीप शेंडे ,सुनील राठोड ,चंद्रशेखर चौधरी, रेखा पारधी ,प्रेमलता बागडे, संगीता बिसेन ,दीपिका यादव ,नामदेव मेश्राम ,रविकुमार पटले, चंद्रकांत धपाडे तज्ञ संचालक दयानंद फटिंग व सीमा भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सभासदांच्या पाल्यांचा वर्ग १० व वर्ग १२ मध्ये प्राविण्य प्राप्त, जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त विद्यार्थी यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे संस्था सचिव तसेच संस्थेचे संचालक उपस्थितीत पडला.
सत्कार समारंभानंतर लगेच वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली.संस्थेचे कार्यकारी प्रमुख सचिव कमलेश बिसेन यांनी आमसभा अहवाल वाचन करून सभेच्या विषय सूचीनुसार रीतसर विषय वाचनाला सुरुवात केली. विषयानुक्रमाने विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन आमसभेला जे विषय होते त्या सर्व विषयावर सभासदांची साधक-बाधक चर्चा होऊन सर्व विषय सर्वानुमते पारित करण्यात आले. सभेला आलेल्या सर्व मान्यवर अतिथी गण यांचे तसेच सर्व मान्यवर सभासद ,संस्था कर्मचारी यांच्या लाभलेल्या सहकार्य बद्दल संस्था सचिव कमलेश बिसेन यांनी मानले.