आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित 4 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
6

गोंदिया, दि.3 : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे 4 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 9.15 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने देवरी कडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता देवरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता देवरी येथून शासकीय वाहनाने कचारगड कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता कचारगड येथे आगमन व भक्त निवासाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता कचारगड येथून शासकीय वाहनाने सालेकसा कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह सालेकसा येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता पुर्ती पब्लिक स्कुल सालेकसा येथे आदिवासी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता सालेकसा येथून शासकीय वाहनाने पुराडा (ता.देवरी) येथील माजी आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता पुराडा येथे संजय पुराम यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5.15 वाजता पुराडा (ता.देवरी) येथून शासकीय वाहनाने गडचिरोली कडे प्रयाण करतील.