एड.एकता गणवीर यांचा “संविधान रत्न” आणि “रमाई गौरव” पुरस्काराने सन्मान

0
13

गोंदिया,दि.06ः- संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली ला १०० वर्ष (शताब्दी) पूर्ण , आणि आई रमाई आंबेडकर यांच्या १२५ वी जयंती समारोहात पूर्ण भारतातील आंबेडकराइट वकिलांना पुरस्कार देउन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव,दाभाडे(पुणे) यांनी सन्मानित केले.यात महाराष्ट्रातील गोंदियाच्या ऍड.एकता सुशील गणवीर यांना “संविधान रत्न” व”आई रमाई” गौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली व्यवसाय आणि संविधान सभामध्ये प्रवेश,भारतीय संविधानचे महत्व सांगून कार्यक्रमाचे अध्यक्षा व समिती अध्यक्षा ऍड.रंजना रघुनाथ भोसले ,केतन कोठावल (अध्यक्ष बार असोसिअन पुणे) ऍड. जयदेव गायकवाड (माजी आमदार पुणे) ,ऍड. गौतम चाबुकस्वर (आमदार पुणे), किसन थुल(सचिव) आणि रावले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

ऍड.एकता सुशील गणवीर यांनी विद्यार्थी जीवनापासूनच बुद्ध,फुले, शाहू , आंबेडकर विचार धारेसी अनेक विद्यार्थ्यांना जोडून जागृत करणे, समस्यांचे निराकरण विविध सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय काम करत आहेत.बोधिस्त्व बुध्द विहार संविधान चौक छोटा गोंदियात एक वर्षापासून बाळ संस्कार शिविर घेत आहेत.मुलांना माहमानवांची विचारधारा,मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी आपले वेळ ,श्रम,पैसा सामाजिक जवाबदारी समजून देत आहेत.

अर्थव बऊदेशीय संस्था गोंदिया द्वारा ८ मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस २०२२ ला महिला क्षेत्रामधे उल्लेखनीय काम केल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल मारारटोलीकडूनही सत्कार करण्यात आले होते.सावित्रीबाई फुले फालोवरस संघटना,गोंदिया मधे २०२० समन्वय साधून गरजू ५० मुलांना शैक्षणिक साईत्य वाटपाचे कार्य प्रत्येकवर्षी करतात.प.पूज्य. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती (२०१७)गोंदियामध्ये सुुध्दा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे “पात्र नाटिका “सादर करून त्यांचे संघर्षमय जीवन लोकांपर्यंत आपल्या नाटिकेच्या माध्यमातून पोचवतात.कोविड-१९ मधे लोकांना खाद्यपदार्थ ,भोजन,कपडे दिले.आपल्या वकिली व्यवसाय मधे गरजू लोकांना (पक्षकारांना) निःशुल्क मदत करतात.गावोगावी जाऊन महिलांना त्यांचे हक्क,अधिकार,विविध कायदे विषयी जागृत करतात.संविधान महोत्सव समिती संविधान चौक छोटा गोंदिया ला २६ नोव्हेंबर (संविधान दिवस) जवळपास ३५ वर्षा पासून साजरा करत आहेत. ऍड.एकता सुशील गणवीर यांनी वडील सुशिल लालाजी गणवीर यांच्यापासून प्रेरित होऊन आपल्या वडिलांकडून होत असलेले सामाजिक , सांस्कृतिक ,धार्मिक आणि राजकीय कार्य पाहून त्यांच्या सोबत सामाजिक कार्य करत आहेत.ऍड. एकता सुशिल गणवीर यांना “संविधान रत्न” “आई रमाई” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.