तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाची मुकाअ पाटील यांनी केली पाहणी

0
8

गोंदिया, दि.9 :  नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी आज (दि.10)तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व तिरोडा तालुका वैद्यकीय कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून माहिती घेतली.

यावेळी जिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती भगत, डॉ. पंकज पटले , डॉ.आशिष बंसोड, डॉ.अर्चना गहेरवार, टेलीमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर कमलेश शुक्ला व औषध निर्माण अधिकारी शरद देशमुख उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाहणीच्यावेळी रुग्णालयात एकूण बाह्यरुग्ण 261 आढळून आले.त्यामध्ये आंतररुग्ण 15 असून त्यापैकी सीटीसीमध्ये 5 ,स्त्री वॉर्डमध्ये 4 आणि पुरुष रुग्ण वॉर्डमध्ये भरती 6 रुग्णांची भेट घेत विचारपूस केली.रुग्णालयात दोन पदे फार्मसीची रिक्त असल्याचे तसेच औषधी साठा पर्याप्त असल्याचे पाहणीत दिसून आले.रुग्णालयातील स्वच्छता व वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयाबद्दल काही तक्रार किंवा त्रुटी आढळून न आल्याने
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.