देवरी व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी परमजितसिंग भाटिया

0
19

देवरी,ता.१३:गोंदिया जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय जैन व जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका संयोजक सुनील अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली परमजितसिंग भाटिया यांची देवरी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

स्थानिक सुप्रसिद्ध व्यापारी परमजितसिंग भाटिया यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. भाटिया यांच्या नेतृत्वाखाली देवरी व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

देवरी तालुका कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष- परमजितसिंग भाटिया, कार्याध्यक्ष-सुजितकुमार अग्रवाल, उपाध्यक्ष- यादोराव पंचमवार, राजकुमार शाहू, संतोष शाहु सत्यनारायण अग्रवाल, राकेश बगडिया, सचिव- मधुसुदन अग्रवाल, सहसचिव- रोमी भाटिया, प्रकाश अग्रवाल,ओंकार शाहु, निर्मल अग्रवाल,दीपक शाहु,कोषाध्यक्ष-राजकुमार मनोहरलाल अग्रवाल, सहकोषाध्यक्ष-किशोर एनप्रेडीवार,विशाल शाहू, मुकेश खंडेलवाल,सिमरन भाटिया, प्रचार प्रमुख-पवन अग्रवाल, सह-प्रचार प्रमुख- हमीद मेमन. संरक्षक कमेटी याप्रमाणे-अन्नु शेख, गोपाल तिवारी, रामप्रसाद अग्रवाल,चंचल जैन, संपतलाल अग्रवाल, प्रेमचंद गुप्ता, रज्जाक भाई, एसडी तिवारी, सचिन भांडारकर